मनोज जरांगे पाटील यांना विरोध केल्याने संभाजीनगरमध्ये मराठा संघटनांनी डॉक्टरच्या तोंडाला फासलं काळं!
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन उभं केलंय. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी ओसीबी आरक्षण बचावसाठी उपोषण केलं होतं. सध्या दोघांनाही उपोषण सोडलं असलं तरी वातावरण तापलेलंच आहे. अशात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घटना घडली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या डॉक्टरांना काळं फासल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. डॉक्टर रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना घडली. मनोज जरंगे यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाला विरोध केल्यामुळे तोंडाला काळे फासल्याची माहिती आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधात रमेश तारख यांनी अर्ज दिला होता. अर्ज दिलेल्या रमेश तारख यांना मराठा संघटनांनी काळे फासले. झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं. धक्कादायक म्हणजे आधी सत्कार केला आणि नंतर काळे फासले. या घटनेमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.