• Thu. Oct 10th, 2024

धर्मवीर -२ मध्ये हिंदुत्वाची गोष्ट,’ मुख्यमंत्री शिंदेंकडून सिनेमाचं दुसरं पोस्ट लॉन्च, येत्या ९ ऑगस्टरोजी प्रदर्शित होणार

ByPolitical Views

Jun 30, 2024



धर्मवीर -२ मध्ये हिंदुत्वाची गोष्ट,’ मुख्यमंत्री शिंदेंकडून सिनेमाचं दुसरं पोस्ट लॉन्च, येत्या ९ ऑगस्टरोजी प्रदर्शित होणार

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – स्व.आनंद दिघे यांच्यावर आधारित असलेला ‘धर्मवीर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच धर्मवीर-२ ची घोषणा करण्यात आली. नुकतच या सिनेमाचं दुसरं पोस्टरही लॉन्च करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर हा सोहळा पार पडला. यावेळी अशोक सराफ, महेश कोठारे आणि बॉबी देओल देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर धर्मवीर-२ हा सिनेमा असणार आहे. हा सिनेमा येत्या ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच हा सिनेमा हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येईल. या सोहळ्याला अनेक दिग्गज देखील उपस्थित होते. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, महेश कोठारे,सचिन पिळगांवकर, बॉबी देओल ही मंडळी देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आजच्या दिवशी दोन वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने कलाकारांकडून मुख्यमंत्री शिंदेंचा सत्कार करण्यात आला. सचिन पिळगांवकरांनी बोलताना प्रसाद ओकच्या अभिनयाचं कौतुक केलंच, पण त्याने धर्मवीर सिनेमा मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका साकारलेल्या क्षितिज दातेचंही कौतुक केलं. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांचा उल्लेख करताना, पुढची दहा वर्ष तुम्हीच आम्हाला मुख्यमंत्री हवे आहात असं म्हटलं. महेश कोठारे यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांचं अभिनंदन करत पुढची वीस वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहा असं म्हटलं. यावेळी त्यांनी कोस्टल रोडचा देखील उल्लेख केला आणि सिनेमासाठीही शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी या सिनेमासाठी शुभेच्छा देत म्हटलं की, मी धर्मवीर-२ सिनेमाचं आणि मंगेश देसाई यांचं खूप खूप अभिनंदन करतो. जेव्हा त्यांनी धर्मवीर हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांनी मला या सिनेमासाठी सहकार्य हवं असं म्हटलं. त्यांच्या सिनेमासाठी मदत करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. कुठल्याही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयात आनंद दिघेंनी अढळ स्थान निर्माण केलं होतं. आनंद दिघेंचं कार्य हे एका सिनेमात उलगडूच शकत नाही. लोकांपर्यंत ते पोहचूच शकत नाही. त्यामुळे पहिला सिनेमा काढल्यानंतर लोकांना वाटलं आता पुढे काय? आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागातून त्या गोष्टी समोर येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसाद ओकच्या अभिनयाचंही कौतुक केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली, ज्याचं कलाकारांनी देखील कौतुक केलं.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें