• Mon. Oct 14th, 2024

ठाणे जिल्हात अजून एक रिक्षावाला मोठा नेता झाला, खासदार बाळयामामा यांनी उलगडला संघर्षमय प्रवास

ByPolitical Views

Jun 30, 2024



ठाणे जिल्हात अजून एक रिक्षावाला मोठा नेता झाला, खासदार बाळयामामा यांनी उलगडला संघर्षमय प्रवास

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – ठाणे जिल्हा आणि राजकीय समीकरण नेहमी जुळलेले दिसले, नव्वदीच्या काळात युनियन आणि युवा पिढी, रिक्षा चालक, गिरणी कामगार, कष्टकरी वर्ग सर्वसामान्य तरुणाई राजकरणात उतरताना दिसली, तीच फळी म्हणजेच तेच नेते नंतरच्या काळात राजकीय पुढारी होताना दिसून आले आहॆ. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गणपत गायकवाड हे पूर्वी रिक्षाचालक होते, नंतर ते राज्याच्या राजकारण सक्रिय झाले, यातच आता अजून एका नेत्याचे नावं भर पडले आहॆ ते म्हणजे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळयामामा म्हात्रे. नुकतीच खासदारकीची निवडणुक जिंकून आणि संसदेतून शपथ घेवून बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे भिवंडी मतदारसंघात परतले आहेत. बदलापूर मधील एका कार्यक्रमात त्यांनी आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला, आपण रेमंड मध्ये नोकरी करायचो, रिक्षा देखील चालवली असे सांगत त्यांनी भूतकाळातील कष्टांची आठवण करुन दिली हे सांगत असताना मी आगरी, मराठी आणि हिंदू असल्याचा अभिमान आहे असे बाळयामामा बोलताना दिसतात. हाच बाळ्यामाम यांचा व्हिडिओ तरुणाईला पंसतीस उतरला आणि आता व्हायरल होत आहे.

बाळ्यामामा म्हणाले मी रेमंड मध्ये काम केलं रिक्षा देखील चालवली ९० ते ९६ सालच्या दरम्यान माझी रेमंड च नोकरी केली त्यानंतर मी त्यावेळेस नोकरी सोडली आणि छोटा मोठा व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून पुढे आलो आणि समाजातील वरिष्ठ ज्यांनी ज्यांनी आयुष्यात मला मार्गदर्शन केलं ज्यांचं ज्यांचं आशीर्वाद लाभले त्यामुळे मी इथे पोहचलो, म्हणून आज आपल्यासमोर आपल्या समाजाचा खासदार म्हणून मी उभा आहे, मी जरी समाज जात भेद मानत नसलो तरी सुद्धा पहिल्यांदा मी आगरी आहे मी मराठी आहे मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें