• Thu. Jan 16th, 2025

ठाकरेंचा भाजपला दे धक्का ! अनिल परब यांचा मुंबई पदवीधर मतदार संघातून दुसऱ्यांदा विजय

ByPolitical Views

Jul 1, 2024



ठाकरेंचा भाजपला दे धक्का ! अनिल परब यांचा मुंबई पदवीधर मतदार संघातून दुसऱ्यांदा विजय

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबई शिक्षक मतदार संघ आणि विधान परिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज सोमवार १ जुलै रोजी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे पार पडली. मुंबई पदवीधर मतदार संघात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी सलग दुसर्‍यांदा विजय मिळवला असून ते मोठ्या मताधिक्क्याने निवडणून आले आहेत. अनिल परब यांनी भाजपला दणका देत ४४ हजार ७८४ मतं मिळवून विजयश्री खेचून आणली आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात ८४ हजार ६६५ पुरुष, तर २६ हजार ६०२ महिला अशा एकूण ७६ हजार ६४६ पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मुंबई पदवीधर मतदार संघात एकूण आठ उमेदवार रिंगणात होते. यात भाजपचे किरण शेलार आणि शिवसेना ठाकरे गटाचे (उबाठा) अनिल परब यांच्यात लढत झाली. तीन फेर्‍यांपैकी पहिल्या फेरीत अनिल परब यांना सुरुवातीच्या पहिल्या फेरीत १८ हजार ७७४, तर किरण शेलार यांना ७ हजार ५७५ मतं मिळाली होती. दुसर्‍या फेरीत परब यांना १८ हजार ३७१, तर किरण शेलार यांना ७,९१७ मतं होती. त्यानंतर शेवटच्या तिसर्‍या फेरीत परब यांनी ७,६३९ आणि शेलार यांनी ३,२८० मतं मिळवली. एकूण मतदानात किरण शेलार यांना १८,७७२ आणि अनिल परब यांना ४४ हजार ७८२ मतं मिळाली. परब यांनी २६ हजार १४ मतांनी विजय मिळवला.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें