• Thu. Oct 10th, 2024

चिंचवड विधानसभा पोट निवडणुक रक्तरंजित; भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलीसांनी केली अटक

ByPolitical Views

Jul 2, 2024



चिंचवड विधानसभा पोट निवडणुक रक्तरंजित; भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलीसांनी केली अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

पिंपरी- चिंचवड – विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पुन्हा एका हत्याकांडानं खळबळ माजली आहे. भाजपचा पदाधिकाऱ्यानं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं अमोल गोरगले यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीतील वाद मनात धरून भाजप पदाधिकाऱ्यानं वचवा काढल्याची धक्कादायक घटना घडली. गुन्हेगार अमोल गोरगले यांची भाजप पदाधिकारी शेखर ओव्हाळ यानं त्याच्या सात ते आठ साथीदारांच्या मदतीनं हत्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी शेखर ओव्हाळसह इतर सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गुन्हेगार अमोल गोरगले याची भाजपचा पदाधिकारी शेखर ओव्हाळ यांच्यासह इतर सहा ते सात जणांनी हत्या केल्याचं समोर आलं आहे, याप्रकरणी शेखर ओव्हाळसह इतर सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर ओव्हाळ याला रावेत पोलिसांनी अटक केली आहे. शेखर ओव्हाळ हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. ऐन चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याच निवडणुकीत अमोल गोरगले आणि शेखर ओव्हाळ याचा वाद झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हाच राग मनात धरून अमोल गोरगले याची हत्या करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील भाजप पदाधिकारी शेखर ओव्हाळच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी अमोल गोरगलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमोल गोरगले तीनच महिन्यांपूर्वी जेलमधून बाहेर आला होता. या प्रकरणी शेखर अशोक ओव्हाळ, मुन्ना उर्फ अभिषेक ओव्हाळ, समीर शेख, महेश कदम, गणेश कदम आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींवर प्रचलित कायद्यांनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें