आज पासून विधानपरिषदेत पुन्हा दिसणार अंबादास दानवे
उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र पाठवून दिलगिरी व्यक्त केल्यानंतर निलंबनाचा कालावधी ५ दिवसांवरून ३ दिवस करण्यात आला
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी ५ दिवसांवरून ३ दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासुन अंबादास दानवे सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार आहेत. अंबादास दानवे यांनी सोमवारी विधानपरिषदेत बोलताना भाजप आमदार प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. त्यानंतर दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून दानवे विधानपरिषदेत दिसू शकतात. अंबादास दानवे यांनी सोमवारी सभागृहात आमदार प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांना निलंबित केलं. अंबादास दानवे यांना ३ दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या कामकाजात पाच दिवस सहभागी होता येणार नव्हतं. मात्र अंबादास दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र पाठवलं. या पत्रातून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे अंबादास दानवे यांच्यावरील कारवाई सभापतींकडून मागे घेण्यात आली आहे.