• Thu. Oct 10th, 2024

वरळीतील हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाच्या उपनेत्याला अटक, अपघातावेळी कार चालवणारा त्याचा मुलगा आणि ड्राइवर फरार

ByPolitical Views

Jul 7, 2024



वरळीतील हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाच्या उपनेत्याला अटक, अपघातावेळी कार चालवणारा त्याचा मुलगा आणि ड्राइवर फरार

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – वरळीतील हिट अँड रन प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेच्या उपनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वरळीत महिलेला आपल्या गाडीखाली चिरडून फरार होणारा आरोपी शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा असल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध सुरू आहे. अपघात झाला त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीत आरोपी मिहीर शहा आणि ड्रायव्हर असल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांकडून मिहीर शहाचा कसून तपास सुरू आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहानं आपल्या पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारनं एका महिलेला चिरडलं आणि अपघातानंतर तिथून पळ काढला. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू होता. पोलिसांनी याप्रकरणी मिहीरचे वडील शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस महिरीच्या मागावर असून त्याचा कसून शोध घेत आहेत.

वरळी हिट अँड रन प्रकरणात वरळी पोलिसांकडून तपासासाठी वाहनाच्या इन्स्पेक्शनसाठी आरटीओ आणि फॉरेन्सिक टिम बोलावलेली. पोलीस मुख्य आरोपी मिहीरच्या मागावर असून त्याचं लोकेशन ट्रेस करत आहेत. अपघात झाल्यानंतर घाबरलेल्या आरोपी मिहीरनं घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर त्यानं गोरेगावला राहत असलेल्या गर्लफ्रेंडचं घर गाठल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. वरळी पोलिसांनी मिहीरच्या वडिलांपाठोपाठ गर्लफ्रेंडलाही ताब्यात घेतलं आहे. गोरेगांवहून सकाळी आठ वाजता आरोपी मिहीर गर्लफ्रेंडच्या घरातून वांद्र्याला मित्राकडे जातो, असं सांगून निघाला. त्यानंतर त्यानं त्याचा फोन बंद करुन टाकला. दरम्यान, वरळी पोलिसांचं आणखी एक पथक वांद्र्याला रवाना झालं आहे. दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगरमधील हिट अँड रन केसने संपूर्ण देशाला हादरा दिला. त्यानंतर आता मुंबईतल्या वरळीतून हिट अँड रन च्या घटनेनं मुंबई हादरली आहे. यात एका महिलेनं तिचे प्राण गमावले आहेत. तर कार चालकानं घटनास्थळावरुन पळ काढला आहे. वरळीतील अट्रीया मॉलजवळ ही घटना घडली.

मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकानं गाडी पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेलं. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषिक केलं.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें