• Mon. Oct 14th, 2024

कुठे आहेत बुलडोझर बाबा?; वरळीतील हिट अँड रन प्रकरणात रविंद्र धंगेकरांची राज्य सरकारवर टिका

ByPolitical Views

Jul 8, 2024



कुठे आहेत बुलडोझर बाबा?; वरळीतील हिट अँड रन प्रकरणात रविंद्र धंगेकरांची राज्य सरकारवर टिका

२४ तास उलटूनही मुख्य आरोपी फरार; विरोधक आक्रमक

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडण्याच्या प्रकरणात मिहीर शहा हे नाव समोर आलं आहे. आरोपी मिहीर शहा हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. राजेश शहा यांना अटक करण्यात आली आहे. मिहीर शहाचा शोध मात्र पोलीस घेत आहेत. २४ तास उलटले तरी सदर घटनेतील अद्याप मुख्य आरोपी फरार असल्याने आता विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

बुलडोझर बाबा कुठे आहेत?,

पुण्यातल्या घटनेनंतर तर बुलडोझर घेऊन कारवाई केली. आता स्वत:च्या पक्षातील पदाधिकाऱ्याचा मुलगा सापडला आहे. तो रात्री मद्यपान करून गाडी चालवत आहे. हे योग्य आहे का ? कायदा हा फक्त सर्व सामान्यांसाठीच आहे का ? मुलाचा बाप सापडतो मुलगा का सापडत नाही?, असा सवाल काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. गाडीवरील नंबरप्लेट व लोगो हटवणाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी रविंद्र धंगेकर यांनी केली आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणात पारदर्शक कारवाई व्हायला हवी. २४ तास उलटले तरी अद्याप मुख्य आरोपी फरार आहे. मुख्य आरोपीची वैद्यकिय चाचणीतून अनेक खुलासे समोर येऊ शकतात. पोलिसांना आरोपी अद्याप कसा सापडत नाही.गाडीवरील पक्षाचे चिन्ह हटवणयाचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. यावर कुठेतरी संशयाला वाव मिळत आहे. आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही. मात्र कारवाई ही पारदर्शक व्हायला हवी, असं ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर म्हणाले. तर या सरकारमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. यातील आरोपीला योग्य कारवाई झाली पाहिजे. कायदा न पाळणाऱ्यांना धाक उरलेला नाही, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे.

मिहीर शहा यास पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी मिहीरचे वडील राजेश शहा आणि चालक राजऋषी बिडावत यांना अटक केली असल्याच्या वृत्ताला पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दुजोरा दिला आहे. २४ वर्षीय मिहीरही व्यावसायिक आहे. तो दारूच्या नशेत असताना हा अपघात घडल्याचा संशय आहे. तो रात्री जुहू येथील एका बारमध्ये मित्रांसह दारू पार्टीसाठी गेला होता. बारमधून निघाल्यावर तो गोरेगावला गेला. मिहीर फरार झाल्यामुळे तो दारूच्या नशेत होता की नाही, याबाबत निश्चित काही निष्कर्ष काढणे शक्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें