• Mon. Oct 14th, 2024

उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला; ‘मातोश्री’ भेटीनंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्पष्टीकरण

ByPolitical Views

Jul 15, 2024



उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला; ‘मातोश्री’ भेटीनंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्पष्टीकरण

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.‘उद्धव ठाकरे यांच्या सोबत विश्वासघात झाला आहे आणि विश्वासघात करणारा कधीही हिंदू असू शकत नाही,’ असं वक्तव्य ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलं. मुंबईतील मातोश्री निवासस्थानी त्यांनी आज भेट दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांनी त्यांचं स्वागत केलं व आशीर्वाद घेतले. यावेळी रश्मी ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांच्या पादुकांचं पूजनही केलं. या भेटीनंतर मातोश्री बाहेर पडताच पत्रकारांनी शंकराचार्यांना गराडा घातला. त्यावेळी बोलताना शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. ‘आम्ही सगळे सनातन धर्म पाळणारे लोक आहोत. पाप-पुण्य मानणारे लोक आहोत. सर्वात मोठा घात गौ घात सांगितला गेला आहे. मात्र त्यापेक्षाही मोठा घात विश्वासघात आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी हा विश्वासघात झाला आहे. हिंदू धर्मात विश्वासघात हे पाप आहे. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही. विश्वासघात सहन करणारा हिंदू होऊ शकतो, असं ते म्हणाले.

‘उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या विश्वासघातामुळं आमचंही मन दु:खी झालं आहे. लोकांच्या मनात ते दु:ख आहे. कालच निवडणुकीत ते सिद्धच झालं आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसत नाहीत तोपर्यंत हे दु:ख हलकं होणार नाही,’ असंही शंकराचार्य म्हणाले. ‘आम्हाला राजकारणाशी घेणंदेणं नाही. जे सत्य आहे, ते आम्ही बोलतो. पाप-पुण्याबद्दल राजकारणी थोडेच बोलणार, त्याबद्दल तर धर्माचार्यच बोलणार ना, असा प्रतिसवाल अविमुक्तेश्वरानंद यांनी केला.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें