• Tue. Sep 10th, 2024

ठाणे शहरात महायुतीमध्ये अलबेल नाहीच?

ByPolitical Views

Sep 3, 2024



ठाणे शहरात महायुतीमध्ये अलबेल नाहीच?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातले निष्ठावंत कार्यकर्ते भाजपमध्ये शामिल; ठाण्यात भाजपची दावेदारी मजबूत

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. परंतु महायुतीमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु असते. गेल्या काही दिवसांपासून भाजप अन् शिंदे गटाकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लक्ष केले गेल्याचे समोर आले. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही, असा संदेश समोर आला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडात भाजपने धक्का दिला आहे. ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचे निष्ठवंत कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहे. राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच बालेकिल्ल्यात ठाणे शहरात महायुतीमध्ये अलबेल नसल्याच दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने देखील ठाणे लोकसभेवर त्यांचा दावा ठोठावला होता. हा वाद अनेक दिवस चालला. परंतु अखेर एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली. शिंदे सेनेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये नाराजी दिसून आली होती. कार्यकर्त्यांमधील ही नाराजी दूर करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरावे लागले. त्यानंतर भाजपमधील नाराजी दूर झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय भोईर व देवराम भोईर यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे. आमच्या कामाला प्रेरित होऊन आणखीन कार्यकर्ते भाजपमध्ये येतील असे यावेळी पक्ष प्रवेश केलेल्या मेघनाथ घरत म्हणाले आहेत. भारतीय पक्षाचे ज्याप्रमाणे शिस्तबद्ध काम चालू आहे, भारतीय जनता पक्षामध्ये संधी मिळते, कामाची शब्बासकी ही मिळते, या भावनेने कार्यकर्ते येत असतात असे भाजप आमदार संजय केळकर यांनी सांगितले आहे. महायुतीमधील दोन पक्षातील कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जात आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात वर्चस्वाची लढाई सुरु झाल्याचे हे संकेत आहेत. भाजप ठाणे मतदार संघात आपला दावा अधिक मजबूत करत आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें