• Thu. Oct 10th, 2024

जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ, छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल

ByPolitical Views

Sep 6, 2024



जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ, छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि शेतकऱ्यांना मदत याबाबत खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चुकीची माहिती पसरवून सरकारची बदनामी केल्याप्रकरणी संभाजीनगर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात बीएनएसकलम ३५३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या जीआरचा चुकीचा संदर्भ देत सरकारने आता आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना मदत देणे बंद केल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. १७ ऑगस्टपासून मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेला सुरुवात झाली. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० दिले जात आहेत. आर्थिक मदतीद्वारे महिलांचे सक्षमीकरण करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठीच्या योजना बंद करण्यात येणार असल्याच्या वृत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खंडन केले. ‘बहुमहत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना राबविल्यामुळे शासनाच्या विविध योजना बंद होणार नाहीत’, असे स्पष्ट केले.

बॉक्स कोट

जितेंद्र आव्हाड यांनी शासनाच्या एका जीआरचा चुकीचा संदर्भ देत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाने आता मदत देणे बंद केल्याचा आरोप केला होता. त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून हा जीआर आणि एक पोस्ट शेअक करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. यामध्ये त्यांनी “आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद, महसूल व वन विभागाने काढले परिपत्रक’लाडकी बहीण’ चा फटका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना?, शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे ‘लाडकी बहीण’ योजनेला”, अशी पोस्ट शेअर केली होती


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें