• Thu. Oct 10th, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार तुमच्या घरी, शिवसेनेची ‘लाडकी बहीण, कुटुंब भेट’ विशेष मोहीम

ByPolitical Views

Sep 6, 2024



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार तुमच्या घरी, शिवसेनेची ‘लाडकी बहीण, कुटुंब भेट’ विशेष मोहीम

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता घराघरात पोहोचली आहे. राज्यातील लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले आहेत. पण आता शिवसेनेकडून आणखी एक मोहीम राबवली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता शिवसेनेची “लाडकी बहीण, कुटुंब भेट” मोहीम सुरू होणार आहे. शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घरा-घरात पोहोचणार आहेत. एवढंच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या मोहिमेत सामील होणार आहेत. प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह घरातील इतर सर्व सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही तसंच ज्यांना लाभ मिळाला नसेल त्या कुटुंबाला तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करणार आहेत. यासाठी शिवसेना विशेष मोहीम राबवणार आहे. शिवसेनेचे शिवसैनिक वाडी, वस्ती आणि गाव स्तरावरील प्रत्येक शिवसैनिक दररोज १० घरांमधील महिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना विविध योजनेचा लाभ मिळाला की नाही याची माहिती घेणार आहेत. ज्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला नसेल तर त्यांना तात्काळ त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार आहेत.

याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आदेश दिला आहे. ‘प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही हे पहायचे आणि ज्यांना लाभ मिळत नसेल त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तात्काळ प्रयत्न करायचे आहेत’ असं मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या आदेशात म्हटलं आहे. लाडकी बहीण योजनेनंतर आता शिवसेना “लाडकी बहीण, कुटुंब भेट” ही मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेत शिवसेनेचे प्रत्येक मतदार संघातील कार्यकर्ते दिवसाला १० घरी भेट देणार आहेत, या भेटीत कुटुंबाच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. दीड कोटी महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाले आहेत. योजनेची अंमलबजावणी, नवी नोंदणी, इतर ज्येष्ठ नागरिक, आणि युवकांच्या पर्यंत योजना पोहचल्या पाहिजेत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नागरिकांना घरी भेट देणार आहेत.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें