• Thu. Oct 10th, 2024

लाडकी बहीण योजना बोऱ्या वाजणार? योजना लोकप्रिय, पण तिजोरीवर फटका; अर्थ खात्याने मांडली कुंडली, नवीन प्रस्तावांना नकारघंटा

ByPolitical Views

Sep 29, 2024



लाडकी बहीण योजना बोऱ्या वाजणार? योजना लोकप्रिय, पण तिजोरीवर फटका; अर्थ खात्याने मांडली कुंडली, नवीन प्रस्तावांना नकारघंटा

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने अनेक नवीन योजनांची घोषणा केली. लाडकी बहीण योजनेने लोकप्रियतेचा कळस गाठला. पण तिजोरीवर त्याचा परिणाम दिसून आला. यासह इतर योजनांमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. खर्चाची गोळाबेरीज करताना राज्याचे अर्थखाते मेटाकुटीला आले आहे. यापूर्वी सुद्धा वाढत्या खर्चाबद्दल अर्थखात्याने रेड अलर्ट दिला होता. आता महसूल तोटा आणि नवीन आर्थिक जबाबादाऱ्यांची सांगड घालणे कठीण झाल्याचे अर्थखात्याने कळवलं आहे. क्रीडा खात्याच्या १७८१ कोटी रुपयांच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या एका प्रकरणात हा प्रकार समोर आला. राज्याच्या अर्थखात्यासमोर स्पोर्ट कॉम्प्लेक्ससाठी १७८१ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यावर अर्थ खात्याने हात वर केले. तरीही राज्य सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला. सरकारने या प्रस्तावासाठी तातडीने ३३९.६८ कोटी रुपये मंजूर करून दिले सुद्धा. क्रीडा विभाग हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे आहे.

क्रीडा खात्यापुढे स्पोर्ट कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव आला. त्यावर अर्थ खात्याने २०२४-२५ मध्ये वित्तीय तुटीचा पाढाच वाचला. त्यानुसार, या आर्थिक वर्षात वित्तीय तूट १,९९,१२५.८७ कोटी रुपयांवर पोहचली आहे. तर महसूली तोटा हा ३ टक्क्यांच्यावर पोहचला. सरकार नवीन योजनांमुळे आर्थिक दबावाखाली आहे. त्यामुळे राज्य सरकार अजून त्यात नवीन आर्थिक ओझे सहन करू शकत नाही. अर्थात अर्थ खात्याने कोणत्याही विशेष योजनेचे नाव घेतले नाही. महाराष्ट्र सरकारने नुकतीच माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेला राज्यात जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यासाठी गावागावातीलच नाही तर शहरातील बड्या घरातील महिलांनी सुद्धा अर्ज केले. या योजनेतंर्गत पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये प्रति महिना जमा होत आहे. दोन महिन्याचा हप्ता अगोदरच जमा झाला आहे. तर काल अनेक महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता पण जमा झाला आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने प्रत्येक वर्षी ४६ हजार कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद केली आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें