काॅंग्रेसकडून माझी उमेदवारी जाहीर हाेती मात्र कोणी तरी सुपारी घेऊन बाळ्या मामाचा बळी दिला – नीलेश सांबरे
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – भिवंडी लाेकसभा मतदारसंघातून मंगळवारी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर माध्यमांशी बाेलताना सांबरे यांनी काॅंग्रेसकडून माझी उमेदवारी जाहीर हाेती मात्र कोणी तरी सुपारी घेऊन बाळ्या मामाचा बळी दिल्याचे नमूद केले. निलेश सांबरे यांनी मंगळवारी त्यांच्या आईला सोबत घेऊन भिवंडी लाेकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वंचित बहूजन आघाडी व खान्देश सेना यांनी देखील सांबरे यांच्या रॅलीत सहभाग नाेंदवित पाठिंबा दर्शविला.
निलेश सांबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले काँग्रेस सोबत बोलणं चाललं आहे. जर एबी फॉर्म मिळाला तर मी काँग्रेसकडून उमेदवारी लढणार असल्याचा दावा सांबरे यांनी केला. काॅंग्रेसकडून माझी उमेदवारी अंतिम हाेती मात्र मध्येच कोणी तरी सुपारी घेऊन बाळ्या मामाचा बळी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे या लोकसभा मतदारसंघात आहेच काय? जे काँग्रेसचे नगरसेवक घेतले आहे त्यांचे अस्तित्व नाही अशी टिप्पणी देखील सांबरे यांनी केली.